शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. भटकंती
  3. देश-विदेश
Written By

हिरवाईचे गर्द डोंगर अर्थातच नैनिताल

nainital
चारही बाजूंनी हिरवाईचे गर्द डोंगर आणि याच्या मधोमध पाचूप्रमाणे देखणा दोन मैल लांबीचा नैनिताल येथील तलाव पाहून मन प्रसन्न होते. या सरोवराला डोळ्याचा आकार आहे. म्हणून नैनी आणि त्याच्या बाजूला सात सरोवरे त्याला स्थानिक भाषेत ताल म्हणतात, म्हणून तलावाचे नाव नैनिताल आहे.
 
उत्तराखंडमधील नैनिताल गावाची उंची समुद्र सपाटीपासून 6837 फूट आहे. येथील लोकसंख्या अंदाजे 38 हजार आहे. हे जिल्ह्याचे प्रमुख ठिकाण आहे. येथील सर्वाधिक शिखर उत्तरेकडील नैना हे 8579 फूट, ‘दे ओपाथ’ पश्चिमेकडील 7999 फूट, ‘आयारापाथ’ दक्षिणेकडे 7474 फूट उंचीचे आहे. नैनितालमध्ये नवकुचिया ताल, नैनिताल, भीमताल, सुखीताल, मल्लीताल, तल्लीताल आणि खुरपाताल असे 7 तलाव आहेत.
 
निसर्गाची विविध रूपे नैनितालमध्ये पाहावयास मिळतात. कोणत्याही ऋतुमध्ये येथे गेले तरी तेथील निसर्ग आनंदच देतो. खर्‍या अर्थाने थंड हवेच्या ठिकाणाचा आनंद येथे मिळत राहातो. हिरवेगार डोंगर, झाडांनी वेढलेली सरोवरे, उमटलेले झाडांचे प्रतिबिंब, कधी निरभ्र आकाश, तर कधी ढगांचे आच्छादन सरोवरातील बोटिंगची मजा यामुळे पर्यटक नैनितालच्या प्रेमात पडतो.
 
नैनितालमध्ये आल्यानंतर येथील सरोवर पाहून मन ताजेतवाने होते. प्रदूषणविरहित शुद्ध आणि थंड हवा ही येथील खासियत आहे. विविध प्रकारच्या पक्ष्यांच्या चिवचिवाटाने येथील सकाळ चैतन्य घेऊन जागी होते. निसर्ग भेटण्यासाठी साद घालीत असतो. निसर्गसौंदर्यांने भरून राहिलेला नैनितालचा कोपरान् कोपरा आपल्याला बोलावत राहतो. निसर्गसौदर्यांची उधळण करत राहतो. गेल्या काही वर्षामध्ये येथे वर्षा पर्यटनासाठी येणार्‍याची संख्याही वाढली आहे. येथील पाऊस अनुभवण्यासाठी पर्यटक मुद्दाम येथे येऊ लागले आहेत. नवकुचिया ताल सर्वात मोठा आहे. 26 चौरस कि. मी. जागा व्यापलेल्या या तलावाची लांबी 1 किमी आणि रूंदी 5 किमी असून तो 40 मीटर खोल आहे. हिमालयाच्या पायथ्याच्या भागात शिवलिक हे 1938 मीटर उंचीवरील नयनरम्य ठिकाण आहे.
 
नैनिताल हे भारतातील एकमेव थंड हवेचे ठिकाण, ज्याचा 85 टक्के भाग हा वृक्षांनी व्यापला आहे. बोटिंग, अँडव्हेंचर स्पोर्टस्, ट्रेकिंग, रिव्हर क्रॉसिंग, रोप क्लायंबिंग, घोडय़ावरून रपेट करण्याची व्यवस्ता येथे आहे.
 
म.अ. खाडिलकर