शनिवार, 28 सप्टेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: मंगळवार, 18 जून 2024 (21:38 IST)

पुण्यात मर्सिडीज कारने दुचाकीस्वाराला चिरडले, दुचाकीस्वाराचा मृत्यू, आरोपी ताब्यात

death
पुण्यात पोर्श कार अपघात प्रकारणांनंतर पुन्हा एका आलिशान कार ने एका दुचाकीस्वाराला चिरडल्याची घटना घडली आहे. या अपघातात दुचाकीस्वाराचा दुर्देवी मृत्यू झाला आहे.

सदर घटना दुपारी 1 वाजता पुण्यातील येरवडा भागातील  गोल्फ कोर्स परिसरातील आहे. एका मर्सिडीज कार ने एका दुचाकीस्वाराला चिरडले. या अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. केदार मोहन चव्हाण असे या मयत व्यक्तीचे नाव आहे. सदर  घटना सीसीटीव्ही केमेऱ्यात कैद झाली आहे. या प्रकरणात येरवडा पोलिसांनी मर्सिडीज चालकाला ताब्यात घेतले आहे. त्याला वैद्यकीय तपासणी साठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. 
 
मंगळवारी दुपारी 1 वाजेच्या सुमारास केदार हे त्यांच्या दुचाकीवरून जात असताना त्यांची दुचाकी घसरली आणि तर रस्त्याच्या मधोमध पडले. तिथून वेगाने येणाऱ्या आलिशान मर्सडिज कारने त्यांना चिरडले या अपघातात ते गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीनं रुग्णालयात नेले असता त्यांचा दुर्देवी मृत्यू झाला. पोलिसांनी कार चालकाला ताब्यात घेतले असून अपघाताचा पुढील तपास पोलीस करत आहे.  
 
Edited by - Priya Dixit