कोको गॉफने जिंकले कारकिर्दीतील दुसरे विजेतेपद
अमेरिकेची 17 वर्षीय टेनिस खेळाडू कोको गॉफ हिने एमिलिया रोमाग्ना ओपन टेनिस स्पर्धेच्या अंतिम फेरीत वांग कियंगचा सहजच पराभव करत कारकिर्दीतील दुसरे व क्ले कोर्टवरील पहिले विजेतेपद जिंकले.
गॉफ महिला जागतिक क्रमवारीत 48 व्या स्थानी असलेल्या चीनच्या खेळाडूविरूध्द 6-1, 6-3 ने विजय नोंदविण्यास केवळ 74 मिनिटांचा वेळ लागला.
गॉफने मागील आठवड्यात इटालियन ओपनमध्ये पहिल्यांदा क्ले कोर्टवर उपान्त्यफेरी गाठली होती. एमिलिया रोमाग्ना ओपन टेनिसची अंतिम लढत जिंकून तिने 30 मे पासून सुरू होणार्यान फ्रेंच ओपनसाठी आपली दावेदारी मजबूत केली आहे. ऑस्ट्रियाच्या लींजमध्ये 2019 साली आपले पहिले विजेतेपद जिंकणार्या गॉफला मागील 26 सामन्यांपैकी 20 सामने जिंकण्यात यश मिळाले आहे.