शुक्रवार, 15 ऑगस्ट 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: मुंबई , मंगळवार, 16 मार्च 2021 (13:52 IST)

दशकातील सर्वोत्कृष्ट संगीतकाराचा पुरस्कार ‘अजय -आतुल’ यांना मिळाला

ajay atul
मराठीपाठोपाठ बॉलिवूडमध्ये स्वत:ची ओळख निर्माण करणारे सुप्रसिद्ध संगीतकार-गायकांची जोडी अजय-अतुल यांना अग्निपथमधील गाण्यासाठी सर्वोत्कृष्ट संगीतकाराचा तसेच सर्वोत्कृष्ट गाण्याचा पुरस्कार मिळाला आहे हा हिंदी संगीत सृष्टीत मानाचा समजला जाणारा मिर्ची म्युजिक पुरस्कार सोहळा नुकताच पार पडला.  फेसबुकच्या माध्यमातून त्यांनी आपल्या चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिली आहे. या सोहळ्यात प्रत्येक मराठी माणसाची छाती अभिमानाने भरून येईल.
 
‘अग्निपथ’ हा चित्रपट २०११ साली प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात ऋतिक रोशन आणि प्रियंका चोपड़ा यांची प्रमुख भूमिका होती. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली. त्याचबरोबर यातील गाणीही तुफान गाजली. त्यातील ‘अभी मुझमें कहीं’ या गाण्याला मिर्ची म्युजिक चा दशकातील सर्वोत्कृष्ट गाणे म्हणून पुरस्कार मिळाला. तसेच या याच गाण्यासाठी सर्वोत्कृष्ट संगीतकार म्हणून अजय-अतुल यांना पुरस्कार मिळाला.
 
या पुरस्काराची माहिती त्यांनी स्वत: आपल्या सोशल मिडियावर शेअर केली आणि या पुरस्कार सोहळ्याचे आणि तमाम चाहत्यांचे आभार मानले. तसेच या गाण्याचे गायक सोनू निगम, गीतकार अमिताभ भट्टाचार्य आणि चित्रपटाच्या संपूर्ण टीमचे देखील अभिनंदन केले.