सोमवार, 26 फेब्रुवारी 2024
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By
Last Modified: रविवार, 2 मे 2021 (16:02 IST)

World Laughter Day खास जोक्स

संध्याकाळी बायको जेवणात मीठ टाकायला विसरली..
नवरा मात्र टेंशनमध्ये... 
तोंडाची चव गेली का काय?

************

या करोनामुळे एक मात्र नक्की समजलं की...
शिक्षण जीवनावश्यकमध्ये येत नाही!

************
 
आज मार्केटमध्ये दोन जणांना बोलताना ऐकलं.
संध्याकाळी कामे लवकर संपव.
आपल्याला कर्फ्यू पाहायला जाऊ.

************
 
गुरुजी : कंपास च्या सहाय्याने एक केंद्र बिंदू धरून वर्तुळ काढा. 
विद्यार्थी आकृती काढतो.
गुरुजी: हे कसलं वेडंवाकडं वर्तुळ काढलंय ?
विद्यार्थी: केंद्रानं साथ दिली नाही गुरुजी!
 
************
यार लॉकडाऊनमध्ये बायकोमुळे खूप त्रासलोय...
का रे काय झालं?
अरे दिवसभर रेसिपीचे व्हिडिओ बघत बसते..
त्यात काय?
दिवसभर इतकं बघूनही रात्री खिचडी करते...

************