शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By
Last Modified: शनिवार, 13 फेब्रुवारी 2021 (10:10 IST)

आता थोडं हसूया...जीवनातील 12 विनोद

1: देवा, मोह माया म्हणजे काय?
आपलं मूल रडलं तर आपलं मन दुखतं...
आणि दुसर्‍याचं रडलं तर आपलं डोकं...
आपली बायको रडली तर आपलं डोकं दुखतं...
आणि दुसर्‍याची रडली तर आपलं मन दुखतं...
ही सगळी प्रभूची मोहमाया आहे!

2: कुंभमेळ्यात एक माणूस प्रार्थना करीत असतो,
"हे देवा न्याय कर, न्याय कर...
हे देवा न्याय कर, न्याय कर...
नेहमी कुंभमेळ्यात भावाभावांची ताटातूट करवतोस...
अधूनमधून नवरा-बायकोची सुद्धा करून पहात जा ना!"
 
3: पत्नी- जानू! तुम्ही मेसेज असायला हवे होते म्हणजे मी तुम्हाला save करून ठेवलं असतं, आणि मनात आलं तेव्हा वाचलं असतं.
पति- किती कंजूस आहेस गं तू! फक्त save च करत राहशील की जरा तुझ्या मैत्रिणींनाही forward करशील...

4: पति- मी गणपती असतो तर तू रोज माझी पूजा केली असतीस... 
मला लाडू खाऊ घातले असतेस, खूप मज्जा आली असती...
पत्नी- हो, खरंच तुम्ही गणपती असायला हवे होते...
रोज तुम्हाला लाडू खाऊ घातले असते...
मग दर वर्षी विसर्जित केलं असतं, आणि नवीन गणपती आणला असता!
खरंच खूप मजा आली असती...

5: जर तुमची पत्नी तुमचं ऐकत नसेल तर...
.
तर ..
.
इतका उत्सुकतेनं काय वाचता आहात? 
अहो कुणाचीच ऐकत नसते.
.
.
त्याला कोणाचाच इलाज नाही.
 
6: पत्नी- जानू! तुला स्वप्नात मी दिसते?
पति- नाही.
पत्नी- कां?
पति- मी "हनुमान चालीसा" वाचून मगच झोपत असतो.
 
7: अविवाहित तरुण - मला नाही लग्न करायचं. मला सगळ्याच बायकांची भीती वाटते...
बाप- मग तर तू लग्न करूनच घे रे बाबा...
मग बघ, तुला फक्त एकाच स्त्रीची भीती वाटेल, बाकी सगळ्या चांगल्या वाटतील...!
 
8: क्लर्क - साहेब, आपण ऑफिसात विवाहित माणसांनाच का ठेवतो?
साहेब- कारण एकतर त्यांना अपमान सहन करण्याची सवय असते आणि दुसरं म्हणजे त्यांना घरी जायची अजिबात घाई नसते.
 
9: पती - तुझ्या बापाची जखमेवर मीठ चोळायची सवय कांही गेली नाही.
बायको- कां काय झालं?
पती- आज त्यांनी मला पुन्हा विचारलं, "माझ्या मुलीशी लग्न करून तू खूश आहेस ना?"
 
10: मनाला स्पर्शून जाणारी गोष्ट...
नवरा आणि बायको फिरायला निघाले.
फिरताना नवरा एका दगडाला धडकला आणि त्याला जखम होऊन रक्त वाहू लागलं. त्यानं आपल्या बायकोकडे बघितलं. त्याला वाटलं ती आता आपली ओढणी फाडून त्याच्या जखमेवर पट्टी बांधील. 
बायको त्याच्या नजरेस नजर देत बोलली, "नुसता विचारदेखील मनात आणू नका... डिझाइनर पीस आहे!!!"
 
11: नवरा बाजारात जातो आहे असं पाहून बायको त्याच्या हाती नोटा कोंबत म्हणाली, 
"अशी एखादी वस्तू घेऊन या जीमुळे मी सुंदर दिसेन"
नवऱ्यानं स्वतःसाठी Whisky च्या दोन बाटल्या आणल्या.

12: माणूस: सर, माझी बायको बेपत्ता झालीय!
पोस्टमन- हे डाकघर आहे, पोलिस ठाणं नाही!!!
माणूस- ओह सॉरी!!! सालं मला इतकी खुशी झाली आहे की, मी कुठे जाऊ हेही कळत नाहीसं झालंय मला...