रविवार, 19 ऑक्टोबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 5 मे 2021 (14:48 IST)

भाजप मराठा समाजाला आरक्षण मिळू नये यासाठी दोन्ही बाजुने खेळतेय - नवाब मलिक

BJP is playing on both sides to prevent reservation for Maratha community - Nawab Malik
भाजप आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे आरक्षण कायद्याच्या विरोधात व मराठा समाजाला आरक्षण मिळू नये यासाठी दोन्ही बाजुने खेळतेय असा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी आज पत्रकार परिषदेत केला आहे.
 
मराठा आरक्षणाला सुप्रीम कोर्टाने रद्द केल्यानंतर आज महाविकास आघाडी सरकारची संयुक्त पत्रकार परिषद झाली.
 
राज्यसरकारची मराठा आरक्षण मिळायला हवे या भूमिकेत आहे. मात्र भाजपचे देवेंद्र फडणवीस सपशेल खोटं बोलत आहेत. आपल्या पैशाने कोर्टात वकील पाठवत आहेत. माजी गृहमंत्री अनिल देशमुख प्रकरणातही माजी पोलीस आयुक्तांना दिलेला वकील भाजपशी संबंधित आहे. न्यायालयीन लढाईसाठी देवेंद्र फडणवीस यांची फूस होती असा आरोपही नवाब मलिक यांनी केला आहे.
 
आघाडी सरकार मराठा समाजाला आरक्षण देवू शकत नाही असे देवेंद्र फडणवीस वारंवार बोलत होते. आज जे वकील कोर्टात लढत आहेत त्याला पाठबळ भाजपचे आहे आणि महाराष्ट्र अशांत करण्याचे कामही भाजप करत आहे असेही नवाब मलिक म्हणाले.