शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Updated : रविवार, 6 फेब्रुवारी 2022 (19:41 IST)

पंतप्रधान मोदींनी लतादीदींना वाहिली श्रद्धांजली

Lata Mangeshkar Death LIVE: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लता मंगेशकर यांना वाहिली श्रद्धांजली. त्यांनी लतादीदींच्या पार्थिवावर फुले ठेवून त्यांना नमन केले. यानंतर पंतप्रधान मोदींनी तेथे उपस्थित लतादीदींच्या कुटुंबीयांशी चर्चा केली. पंतप्रधानांनी तेथे उपस्थित लोकांना हात जोडून अभिवादन केले आणि प्रत्येकाची भेट घेतली.
शाहरुख खानने वाहिली श्रद्धांजली
चित्रपट अभिनेता शाहरुख खानने लता मंगेशकर यांचे शेवटचे दर्शन घेतले आणि त्यांच्यासाठी प्रार्थना केली. त्यांनी लता मंगेशकर यांच्या पार्थिवाच्या जवळ उभे राहून त्यांच्यासाठी काही वेळ प्रार्थना केली आणि नंतर तेथून खाली उतरले. त्यांच्याशिवाय सचिन तेंडुलकर आणि मधुर भांडाकर यांनीही लतादीदींना श्रद्धांजली वाहिली.