शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: शुक्रवार, 25 सप्टेंबर 2020 (14:36 IST)

सुप्रसिद्ध पार्श्वगायक एस.पी.बालसुब्रमण्यम यांचे वयाच्या 74व्या वर्षी निधन

भारतीय सिनेसृष्टीतील प्रसिद्ध गायक एसपी बालसुब्रमण्यम यांचे आज निधन झाले. वयाच्या ७४ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या महिन्यात त्यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर उपचारासाठी त्यांना एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

सुरुवातीला त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले होते मात्र, कालपासून त्यांची प्रकृती अचानक खालावली होती आणि आज त्यांनी अखेरचा श्वास घेतला.