मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: गुरूवार, 24 सप्टेंबर 2020 (08:38 IST)

रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांचे कोरोनामुळे निधन

रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी (६५) यांचे कोरोनामुळे निधन झाले. त्यांच्यावर दिल्लीतल्या एम्स रुग्णालयामध्ये उपचार सुरू होते. ११ सप्टेंबरला त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे उघड झाले. त्यांनी स्वत: ट्विट करून त्याची माहिती दिली होती. ते बेळगावचे खासदार होते. दरम्यान, सुरेश अंगडी यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे. पंतप्रधान मोदी यांनी ट्विट करून त्यांच्या कुटुंबीयाबद्दल संवेदना व्यक्त केली आहे.
 
 बेळगावमधील सदाशिव नगरमध्ये ते राहत होते. दोन दिवसांपूर्वी त्यांना जास्त त्रास होत असल्याने त्यांना अतिदक्षता विभागात हलविण्यात आले होते. त्यांना पाहिल्यादाच मंत्रीपद मिळालं होते.  ते सलग चारवेळा निवडून आले होते. कन्नडबरोबरच ते मराठी उत्तम बोलायचे.