दोन महत्त्वाचे खेळाडू यूएईत दाखल मुंबई इंडियन्सचे बळ वाढले

मुंबई| Last Modified सोमवार, 14 सप्टेंबर 2020 (12:49 IST)
आयपीएलचा तेराव्या हंगाम आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. 19 सप्टेंबरपासून यूएईत या स्पर्धेला सुरुवात होईल. गतविजेते मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपरकिंग्ज यांच्यात सलामीचा सामना रंगणार आहे. सलामीच्या सामन्यासाठी दोन्ही संघ कसून सराव करत आहेत. गतविजेत मुंबई इंडियन्सच्या ताकदीत आता अजून वाढ होणार आहे. कारण संघाचा महत्त्वाचा अष्टपैलू खेळाडू कायरन पोलार्ड आणि यंदा मुंबईकडून खेळणारा शेर्फन रुदरफोर्ड हे यूएईत दाखल झाले आहेत.
कॅरेबिअन प्रीमिअर लिग स्पर्धेत खेळल्यानंतर पोलार्ड आणि रुदरफोर्ड हे दोन्ही खेळाडू आपल्या परिवारासोबत यूएईत दाखल झाले आहेत. मुंबई इंडियन्सने या दोन महत्त्वाच्या खेळाडूंच्या आगमनाची बातमी आपल्या चाहत्यांना दिली आहे.

कायरन पोलार्ड याचे फॉर्मात असणे मुंबई इंडियन्ससाठी फायदेशीर मानले जाते. कॅरेबिअन प्रीमिअर लिग स्पर्धेत पोलार्डच्या त्रिंबागो नाईट राडर्स संघाने विजेतेपद मिळवमले आहे.
महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा संघ या स्पर्धेत एकही सामना हरला नाही. पोलार्डने संपूर्ण स्पर्धेत गोलंदाजी आणि फलंदाजीत अष्टपैलू कामगिरी करत मालिकावीराचा किताब पटकावला आहे. त्यामुळे मुंबई इंडिन्सकडून खेळतानाही पोलार्डने आपला फॉर्म कायम राखल्यास संघाला त्याचा फायदा होईल.


यावर अधिक वाचा :

रिलायन्स जिओने 'जिओ पोस्टपेड प्लस' योजना सुरू केली

रिलायन्स जिओने 'जिओ पोस्टपेड प्लस' योजना सुरू केली
मुकेश अंबानी यांची कंपनी रिलायन्स जिओने पोस्टपेड वापरकर्त्यांसाठी अनेक नवीन योजना सुरू ...

मीही आंदोलनात सहभागी होऊन एक दिवस अन्नत्याग करत आहे - शरद ...

मीही आंदोलनात सहभागी होऊन एक दिवस अन्नत्याग करत आहे - शरद पवार
शेती बिलावरून राज्यसभेत झालेल्या राड्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि राज्यसभेतील ...

सविनय कायदेभंग आंदोलन करणारे मनसे नेते संदीप देशपांडे यांना ...

सविनय कायदेभंग आंदोलन करणारे मनसे नेते संदीप देशपांडे यांना अटक
मुंबईची लोकल लवकर सुरु करा, या मागणीसाठी मनसेकडून सविनय कायदेभंग आंदोलन करण्यात आलं होतं. ...

बाप्परे, तब्बल ४६ लाखांचा सुमारे ३१२ किलो गांजा जप्त

बाप्परे, तब्बल ४६ लाखांचा सुमारे ३१२ किलो गांजा जप्त
बारामती तालुका पोलिसांनी केलेल्या कारवाईत तब्बल ४६ लाखांचा गांजा असलेला टेंपो ...

इंदूरच्या खासगी रुग्णालयात उंदरांनी मृतदेह कुरतडला, तपासाचा ...

इंदूरच्या खासगी रुग्णालयात उंदरांनी मृतदेह कुरतडला, तपासाचा आदेश
रविवारी रात्री कोविड -19 मुळे 87 वर्षीय व्यक्तीच्या निधनानंतर येथील खासगी रुग्णालयात ...

रंगतदार सामन्यात बंगळुरूची बाजी

रंगतदार सामन्यात बंगळुरूची बाजी
येथील मैदानावर रंगलेल्या सामन्यात विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने मुंबई ...

IPL 2020: राजस्थान रॉयल्सला एका षटकात 5 षटकार मारून ...

IPL 2020: राजस्थान रॉयल्सला एका षटकात 5 षटकार मारून जिंकण्यात मदत करणारा राहुल तेवतिया कोण?
शारजाह रविवारी शारज्याच्या मैदानावर राजस्थान रॉयल्स आणि किंग्ज इलेव्हन पंजाबचा (RR vs ...

कार्तिक यशस्वी होणार की वॉर्नरची बॅट तळपणार : आज ...

कार्तिक यशस्वी होणार की वॉर्नरची बॅट तळपणार : आज कोलकाताविरुध्द हैदराबाद यांच्यात लढत
आयपीएलच्या सुरूवातीच्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सचा कर्णधार दिनेश कार्तिकच्या ...

चेन्नईचा सलग दुसरा पराभव

चेन्नईचा सलग दुसरा पराभव
महेंद्रसिंह धोनीच्या चेन्नई सुपर किंग्ज संघाला आयपीएलच्या तेराव्या हंगामात सलग दुसर्‍या ...

…म्हणून विराटला ठोठावला आहे दंड

…म्हणून विराटला ठोठावला आहे दंड
आयपीएलमधील किंग्ज इलेव्हन पंजाब विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात खेळण्यात आला. या ...