शुक्रवार, 3 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. आयपीएल 2020
Written By
Last Updated : बुधवार, 9 सप्टेंबर 2020 (21:07 IST)

'म्हणून' सुरेश रैना भारतात परतला

आयपीएलमधल्या चेन्नई सुपर किंग्जचा सदस्य सुरेश रैनाच्या कुटुंबियांवर जीवघेणा हल्ला झाला आहे. यात रैनाच्या काकांचा मृत्यू झाला असून काकी गंभीर जखमी झाली आहे. त्यामुळे रैना यूएईवरून भारताकडे रवाना झाला. 
 
सुरेश रैनाचे नातेवाईक पठाणकोट जवळील थरियाल गावात राहतात. रात्रीच्या सुमारास घराच्या छतावर झोपलेले असताना त्यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला. अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्यावर धारधार हत्यारांची हल्ला चढवला. यात रैनाची काकी आशा देवी गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत, तर त्यांचे पती अशोक कुमार (58) यांचा या हल्ल्यात मृत्यू झाला आहे. रैनाचे भाऊ कौशल कुमार (32) आणि अपिन कुमार (24) हे देखील जखमी झाले आहेत. 
 
चेन्नई सुपर किंग्जचे सीईओ के.एस. विश्वनाथन यांनी 29 ऑगस्टला ट्विट करून सुरेश रैना आयपीएलच्या 13 व्या सत्राला मुकणार असल्याची माहिती दिली आहे.