1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. आयपीएल 2020
Written By
Last Updated : बुधवार, 9 सप्टेंबर 2020 (21:08 IST)

सुरेश रैना आयपीएलच्या संपूर्ण सीजनमधून बाहेर

suresh raina
आयपीएल २०२० मध्ये चेन्नई सुपर किंग्ज चा धडाकेबाज फलंदाज सुरेश रैना त्याच्या वैयक्तिक कारणामुळे यूएईमधून भारतात परतला आहे. 19 सप्टेंबरपासून सुरु होणाऱ्या आयपीएलसाठी संघ यूएईमध्ये दाखल झाले आहेत. मात्र रैना मायदेशी परतला असून यामागील कारण अद्याप समजू शकलेलं नाही. चेन्नई सुपर किंग्जने ट्विटरवरुन ही माहिती दिली आहे. 
 
सुरेश रैना आयपीएलच्या संपूर्ण सीजनमधून बाहेर झाला आहे. एक दिवस आधी चेन्नईच्या टीममधील 13 जणांना कोरोना झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली होती. दुबईमध्ये पोहोचल्यानंतर चेन्नईच्या टीमची कोरोना चाचणी करण्यात आली. यात 13 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले. कोरोना झालेल्या सर्वांची प्रकृती स्थिर असून त्यांना विलगीकरणात ठेवण्यात आल्याची माहिती आहे.