मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: मंगळवार, 25 ऑगस्ट 2020 (09:15 IST)

Honda ची दमदार बाइक Shine झाली महाग, कंपनीने किंमतीत केली वाढ

होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडियाने (Honda Motorcycle and Scooter India) भारतीय बाजारातील आपली बाइक Honda Shine च्या किंमतीत वाढ केली आहे. कंपनीने ही बाइक फेब्रुवारी महिन्यात नवीन बीएस-6 इंजिनसह लाँच केली होती. बीएस-6 इंजिनमध्ये (BS-6 Engine) लाँच केल्यापासून कंपनीने पहिल्यांदाच या बाइकच्या किंमतीत वाढ केली आहे.  होंडा शाइन ही बाइक आपल्या सेगमेंटमधील बेस्ट सेलिंग बाइकपैकी एक आहे.
 
स्पेसिफिकेशन्स :-
भारतीय बाजारात नवीन शाइनची थेट टक्कर हीरो सुपर स्प्लेंडरसोबत आहे. कंपनीने या बाइकमध्ये 125cc क्षमतेचं HET तंत्रज्ञान असलेलं सिंगल (Honda Motorcycle and Scooter India) सिलिंडर, एअर कुल्ड इंजिन दिलं आहे. हे इंजिन 10.59hp ची पॉवर आणि 11Nm टॉर्क निर्माण करतं. यात 5 स्पीड गिअरबॉक्स आहेत. नवीन इंजिनमध्ये अपडेट केल्यापासून बाइकचा मायलेज 14 टक्क्यांनी वाढला असल्याचा दावा कंपनीने केला आहे. याशिवाय फ्युअल इंजेक्शन सिस्टिममुळे बाइकचा थ्रोटल रिस्पॉन्स आधीपेक्षा सुधारला आहे. 114 ते 115 किलोग्रॅम वजन असलेल्या शाइनमध्ये 162mm ग्राउंड क्लीअरेन्स आहे. बाइकमध्ये 10.5 लिटर पेट्रोल टाकी असून पर्यायी फ्रंट डिस्क ब्रेकही मिळेल. यात 240mm डिस्क ब्रेक आणि 130mm ड्रम ब्रेक स्टँडर्ड आहे.
 
नवीन किंमत :-
कंपनीने शाइनच्या किंमतीत 532 रुपयांची वाढ केली आहे. किंमतीत वाढ करण्याचं नेमकं कारण कंपनीकडून सांगण्यात आलेलं नाही. किंमतीतील (Honda Motorcycle and Scooter India) वाढीमुळे आता या बाइकच्या ड्रम ब्रेक व्हेरिअंटची किंमत 68 हजार 812 रुपये आणि डिस्क ब्रेक व्हेरिअंटची किंमत 73 हजार 512 रुपये झाली आहे.