शुक्रवार, 22 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: शनिवार, 22 ऑगस्ट 2020 (10:26 IST)

अदानी उद्योग समूहाकडे 'या' विमानतळांच्या देखभालीचे कंत्राट

Govt clears leasing out three airports via PPP
देशातील जयपूर, गुवाहाटी आणि तिरुअनंतपुरम विमानतळांच्या देखभाल आणि हाताळणीचे कंत्राट अदानी उद्योग समूहाला देण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे.
 
जयपूर आंतरराष्ट्रीय विमानतळ, गुवाहाटीमधील लोकप्रिय गोपीनाथ बोर्डोलोई आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि तिरुअनंतपुरममधील त्रिवेंद्रम आंतरराष्ट्रीय विमानतळांची देखभाल करण्याचे हक्क अदानी समूहाला देण्यात आले आहेत. 
 
अदानी समूहाला सहा विमानतळांच्या देखभाल आणि हाताळणीचे ५०  वर्षांचे कंत्राट मिळाले आहे. यापूर्वी फेब्रुवारी २०१९  मध्ये लखनऊ, अहमदाबाद आणि मंगळूर विमानतळाचे कंत्राट मिळाले होते.