मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: बुधवार, 11 मार्च 2020 (13:14 IST)

सॅनिटरी नॅपकिनबरोबर विल्हेवाटीसाठी पिशवी देणे बंधनकारक

देशांमध्ये सॅनिटरी नॅपकिनचा वापर वाढला असून त्याचबरोबर त्यांच्या विल्हेवाटीसाठी अजून प्रयत्न करण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले. सॅनिटरी नॅपकिन उत्पादकांना प्रत्येक नॅपकिन बरोबर विल्हेवाटीसाठी पिशवी देणे बंधनकारक आहे. परंतु हा नियम काटेकोरपणे पाळला जात नाही तर जानेवारी 2021 पासून तो सर्वांना बंधनकारक राहील अशी घोषणा त्यांनी केली आहे. कचरा वेचक संघटनेला स्वच्छता सेविका संघटना म्हटले पाहिजे कारण त्या देशाची खूप मोठी सेवा करत आहेत असे प्रतिपादन पर्यावरण वन आणि हवामान बदल मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केले. आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने स्वच्छ पुणे सेवा सहकारी संस्थे द्वारा आयोजित कार्यक्रमामध्ये ते बोलत होते .
 
शैक्षणिक संस्था, हाउसिंग कॉलनी यांनी आपल्या परिसरातच कचरा जिरवला पाहिजे. नगर परिषद असलेल्या शहरांना कचरा व्यवस्थापनाची सक्ती आहे परंतु यापुढे 3000 पेक्षा जास्त लोकवस्ती असलेल्या कुठल्याही गावाला कचऱ्याचे व्यवस्थापन बंधनकारक राहील अशी घोषणा त्यांनी यावेळी केली.