मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: गुरूवार, 27 ऑगस्ट 2020 (08:53 IST)

भारताने रशियाकडून कोरोना लस घेण्याची व्यक्त केली ईच्छा

रशियाने कोरोनावरील लस विकसित केल्याचा दावा केला आहे. ही लस काही दिवसातच चाचणीसाठी इतर देशांनाही दिली जाणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. रशियाने बनवलेल्या या लसीवर मात्र काही देशांनी शंका व्यक्त केली आहे. यामध्ये अमेरिका, जर्मनी, फ्रान्स आणि स्पेन या देशांचा समावेश आहे. दरम्यान, भारताने मात्र या लसीवर विश्वास दर्शवला असून त्याबाबत केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने माहिती दिली आहे. भारताने ही रशियाकडून ही लस घेण्याची इच्छा व्यक्त केली असून यासाठी दोन्ही देशांमध्ये चर्चा सुरू असल्याची माहिती, आरोग्य मंत्रालयाच्या वतीने देण्यात आली आहे.
 
या लसीच्या तिसऱ्या पट्ट्यातील चाचणी प्रक्रिया सुरू आहे. तिसऱ्या पट्ट्यातील चाचणीसाठी रशियातील ४५ केंद्रांवर ४० हजारांहून जास्त लोकांवर याचा प्रयोग केला जात आहे. रशियाकडे एक अब्ज डोसची ऑर्डर नोंदवण्यात आली आहे. सध्या रशियाकडे ५० कोटी डोस निर्मिती करण्याची क्षमता आहे.