मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Updated : गुरूवार, 27 ऑगस्ट 2020 (17:30 IST)

कोरोना रुग्ण संख्येत भारत जगात दुसऱ्या स्थानावर

भारतामध्ये काही दिवसांपासून कोरोना रूग्णांची संख्या दिवसाला तब्बल ५० ते ६० हजारांच्या घरात वाढते आहे. गुरुवारी देशाच्या एकूण कोरोनाबाधित रुग्णसंख्येमध्ये ७५ हजार ७६० रुग्णांची भर पडली. आत्तापर्यंत २४ तासांत नव्याने भर पडलेली ही सर्वाधित रुग्णसंख्या आहे.  भारतानं आता कोरोनाच्या Active पेशंटच्या संख्येमध्ये ब्राझीलला देखील मागे टाकलं आहे. आत्तापर्यंत या बाबतीत अमेरिका पहिल्या स्थानावर तर ब्राझील दुसऱ्या आणि भारत तिसऱ्या स्थानावर होता. मात्र, गुरुवारी भर पडलेल्या नव्या रुग्णसंख्येनंतर भारतानं ब्राझीलला मागे टाकलं आहे.
 
जगभरातल्या कोरोना  रुग्णसंख्येच्या ताज्या आकडेवारीनुसार आजघडीला अमेरिकेमध्ये सर्वाधिक २ कोटी ५० लाख २ हजार ७६२ इतके Active रुग्ण आहेत. अर्थात, इतक्या रुग्णांवर अमेरिकेत उपचार सुरू आहेत. भारतात हाच आकडा आता ७ लाख २९ हजार ७८३ इतका झाला आहे. तर ब्राझीलमध्ये एकूण ६ लाख ९५ हजार ४०० रुग्णांवर उपचार सुरू आहेत. विशेषत: गंभीर रुग्णांची संख्या देखील भारतात जास्त आहे. भारतात ८ हजार ९४४ रुग्ण गंभीर असून ब्राझीलमध्ये गंभीर रुग्णांचा आकडा ८ हजार ३१४ च्या घरात आहे.