शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: गुरूवार, 27 ऑगस्ट 2020 (09:31 IST)

राज्यात नवे १४ हजार ८८८ कोरोना रुग्णांचे निदान

राज्यात ७६३७ रुग्ण बरे झाले तर १४ हजार ८८८ नवीन रुग्णांचे निदान झाले. राज्याचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढून ते ७२.६९ टक्के झाले. राज्यभरात आतापर्यंत एकूण ५ लाख २२ हजार ४२७ रुग्ण बरे झाले आहेत. सध्या १ लाख ७२ हजार ८७३ रुग्णांवर (ॲक्टिव्ह) उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी  दिली.
 
पाठविण्यात आलेल्या ३७ लाख ९४ हजार ०२७ नमुन्यांपैकी ७ लाख १८ हजार ७११ नमुने पॉझिटिव्ह (१८.९४ टक्के) आले आहेत. राज्यात १२ लाख ६८ हजार ९२४ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या ३३ हजार ६४४ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज २९५ करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर ३.२१ टक्के एवढा आहे.