भट परिवाराला धमकी आरोपी अटकेत
प्रसिद्ध चित्रपट निर्माता- दिग्दर्शक महेश भट यांच्याकडे 50 लाखांच्या खंडणीची मागणी करणाऱ्याला उत्तर प्रदेश पोलिसांंनी अटक केली आहे. महेश भट्ट यांना काल फोनवरुन एका अज्ञात व्यक्तीने 50 लाख रुपयांची मागणी केली होती. त्याचबरोबर, जर हे पैसे दिले नाही तर मुलगी आलिया भट आणि पत्नी सोनी राजदान यांना जीवे मारण्याची धमकीही या व्यक्तीने भट यांना दिली होती.या बाबत महेश भट पोलिसांकडे धाव घेतली आणि कारवीची मागणी केली आहे. पोलिसांनी लगेच कारवाई केली आहे.