मलाइका अरोराच्या गाडीला पनवेल जवळ अपघात, डोक्याला दुखापत
बॉलिवूड अभिनेत्री मलाइका अरोराच्या गाडीला पनवेल जवळ अपघात झाला. मलायकाच्या ड्रायव्हरचा गाडीवरील ताबा सुटला आणि राज ठाकरे यांच्या सभेला पुण्यावरून जात असणाऱ्या मनसे पदाधिकाऱ्यांच्या तीन गाड्यांना मलायकाच्या गाडीने धडक दिली. या घटनेत मलायकाच्या डोक्याला दुखापत झाली असून, तिला नवी मुंबईतील अपोलो रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. ही माहिती महाराष्ट्र निर्माण सेनेच्या जनहित संघटनेचे ज्यांनी सरचिटणीस जयराज लांडगे यांनी दिली आहे.
जयराज लांडगे म्हणाले, “राज ठाकरे यांच्या सभेला पुण्यावरून मुंबईकडे आम्ही निघालो असताना पनवेलनजीक मलाइका अरोरा यांच्या गाडी वरील ड्रायव्हरचा ताबा सुटून मनसेच्या तीन गाड्यांना मलायका यांच्या गाडीने धडक दिली. या घटनेत त्यांच्या डोक्याला दुखापत झाली आहे. त्यांना नवी मुंबई येथील रुग्णालयात आपण दाखल केले आहे अशी माहिती लांडगे यांनी दिली आहे.