गुरूवार, 1 जानेवारी 2026
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: शुक्रवार, 18 नोव्हेंबर 2016 (10:39 IST)

पॅरिसमध्ये मल्लिकाला मारहाण, हल्लेखोरांनी लुटले

mallika sherawat
पॅरिसमध्ये बॉलिवूड अभिनेत्री मल्लिका शेरावतला मारहाण झाली आहे. यात मल्लिका घराबाहेर पडली असता अश्रुधुराचा वापर करत मल्लिका आणि तिच्या सोबत असलेल्या व्यक्तीला मारहाण केली आहे. तिच्याकडे असलेला मौल्यवान ऐवज लुटून नेला आहे. मल्लिकाने  पोलिसांना संपर्क साधत मारहाणीची माहिती दिली आहे. पोलिसांनी याप्रकरणी तपास सुरु केला आहे. मात्र  हल्लेखोरांनी चेहऱ्यावर मास्क लावला असल्यामुळे त्यांची ओळख पटवण्यात अडचणी येत आहेत.