शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Updated : रविवार, 16 ऑक्टोबर 2022 (20:36 IST)

मंदाकिनी करतेय पुनरागमन म्युझिक व्हिडिओत दिसणार

राम तेरी गंगा मैली’या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये स्वतःची ओळख निर्माण करणारी प्रसिद्ध अभिनेत्री मंदाकिनी पुन्हा एकदा चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवत आहे. मंदाकिनी स्वतःचा म्युझिक व्हिडिओ ‘मां ओ मां’द्वारे पुनरागमन करत आहे. गाण्याचा फर्स्ट लुक पोस्टर प्रदर्शित करण्यात आला आहे.
मंदाकिनी यापूर्वी 1996 मध्ये प्रदर्शित ‘जोरदार’ या चित्रपटात दिसून आली होती. दोन दशकांपेक्षा अधिक काळानंतर मंदाकिनी आता पुन्हा मनोरंजन क्षेत्रात पाऊल ठेवत आहे. यावेळी ती पुत्र रब्बिल ठाकूरसोबत पुनरागमन करत आहे. रब्बिल ठाकूरचे पदार्पण असणार आहे.
या पोस्टरमध्ये मंदाकिनी लाल रंगाच्या सलवार सूटमध्ये दिसून येत आहे. यात तिचा पुत्र रब्बिलसोबत अन्य लोकही आहेत. ‘पोस्टरवर तुमचा फीडबॅक द्या, तुमची प्रतिक्रिया जाणून आनंद होईल’असे मंदाकिनीने पोस्टर शेअर करत कॅप्शनमध्ये म्हटले आहे.
दिग्दर्शक सजन अग्रवाल यांच्यासोबत काम करून अत्यंत आनंद होतोय. मी पूर्वीपासून त्यांना ओळखत होते, परंतु आता आम्ही सोबत काम करत आहाहेत. ‘मां ओ मां’ हे अत्यंत सुंदर गाणे आहे. यात माझा मुलगा मुख्य भूमिकेत आहे असे मंदाकिनी यांनी म्हटले आहे. या गाण्याचा म्युझिक व्हिडिओ सजन अग्रवाल यांनी दिग्दर्शित केला आहे. त्यांनीच हे गाणे लिहिले आहे.