शुक्रवार, 22 नोव्हेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Updated : बुधवार, 19 मे 2021 (15:39 IST)

Manoj Bajpayeeचा 'दि फॅमिली मॅन 2'चा ट्रेलर समोर आला आहे, 4th June 2021या दिवशी रिलीज होणार वेब सीरिज

'दि फॅमिली मॅन'चा नवीन सीझन अधिक उत्कंठावर्धक असण्यासोबत त्यामध्ये अधिक रोमांच व एक क्रूर प्रतिस्पॅर्धी आहे. हा शो भारतामध्ये आणि २४० देश व प्रदेशांमध्ये अॅमेझॉन प्राइम व्हिडिओवर पाहता येईल. 
 
उत्साहवर्धक जोडी राज व डीके यांची निर्मिती असलेली अॅमेझॉन ओरिजिनल सिरीज 'दि फॅमिली मॅन'च्या नवीन सीझनमध्ये सुपरस्टार सामंथा अक्किनेनीचे डिजिटल पदार्पण होताना पाहायला मिळेल, जी शोच्या प्रतिभावान कलाकारांमध्ये सामील होईल जसे पद्मश्री पुरस्कार-प्राप्त मनोज वाजपेयी, प्रियामणी, शरिब हाश्मी आणि सीमा बिस्वास. 
 
मुंबई, भारत, १९ मे २०२१ –प्रतिक्षाकाळ जवळपास संपला आहे! सर्व अपेक्षांची पूर्तता करत आणि लाखो चाहत्यांना उत्साह देत अॅमेझॉन प्राइम व्हिडिओने आज अधिकृतरित्या उत्साहवर्धक जोडी राज व डीके यांची निर्मिती असलेली बहुप्रशंसित सिरीज 'दि फॅमिली मॅन'च्या नवीन सीझनसाठी रीलीज तारीख म्हणून 4th June 2021या तारखेची घोषणा केली आहे.
 
ही लक्षणीय घोषणा करत अॅमेझॉन प्राइम व्हिडिओने आज देशाचा सर्वात प्रेमळ फॅमिली मॅन ऊर्फ श्रीकांत तिवारीच्या पुनरागमनाला दाखवणाऱ्या शोचा लक्षवेधक ट्रेलर सादर केला आहे. मनोज वाजपेयी (Manoj Bajpayee) यांनी ही भूमिका साकारली आहे. या सीझनमध्ये श्रीकांत तिवारी नवीन, शक्तिशाली व क्रूर प्रतिस्पर्धी राजीचा सामना करणार आहे. सामंथा अक्किनेनीने (Samantha Akkineni) राजीची भूमिका साकारली आहे. या थ्रिलर सिरीजच्या ९ भागांच्या नवीन सीझनमध्ये श्रीकांत मध्यमवर्गीय फॅमिली मॅन व जागतिक दर्जाचा गुप्तचर अशा दुहेरी भूमिका साकारताना आणि देशाचे घातक हल्ल्यानं पासून संरक्षण करण्याचा प्रयत्न करताना पाहायला मिळणार आहे. रोमांचपूर्ण ट्विस्ट्स आणि अनपेक्षित क्लायमॅक्स असलेल्या या अॅक्शान-ड्रामाने भरलेल्या सिरीजचा आगामी सीझन श्रीकांतच्या  दुहेरी विश्वांची लक्षवेधक झलक दाखवेल. 
 
येथे ट्रेलर पाहा- 
 
 ट्रेलर सादरीकरणाबाबत बोलताना अॅमेझॉन प्राइम व्हिडिओच्या इंडिया ओरिजिनल्साच्या प्रमुख अपर्णा पुरोहित म्हलणाले,''आमची पात्रं घराघरांमध्ये लोकप्रिय बनत आहेत, यासारखा दुसरा आनंद कोणताच नाही. वैशिष्ट्यापूर्ण फॅमिली मॅन श्रीकांत तिवारीला मिळालेले प्रेम व प्रशंसा उत्तम, वास्तनववादी कथा सर्व मर्यादांना मोडून काढण्याबाबत असलेल्या  आमच्यात विश्वासाला अधिक दृढ करतात. 'दि फॅमिली मॅन'चा नवीन सीझन अधिक रोमांचक, अधिक जटिल आणि अधिक अॅक्शने भरलेला आहे. आम्हाला विश्वास आहे की, प्रेक्षक श्रीकांत आणि त्याच्या प्रतिस्पर्धीमधील आमना-सामना पाहण्यासाठी खूपच उत्सुक असतील. अॅमेझॉनमधील आम्हा सर्वांसाठी भारतातील, तसेच भारताबाहेरील प्रेक्षकांशी संलग्नं होणाऱ्या सर्वोत्तम कन्टेन्ट्ला सादर करण्यांचा क्षण अत्यंत आनंददायी आहे आणि आम्ही पुढील महिन्यामध्ये शोचा नवीन सीझन सादर करण्यासाठी खूपच उत्सुक आहोत.''
 
निर्माते राज व डीके म्हाणाले,''निर्माते म्हणून आम्ही आज 'दि फॅमिली मॅन'च्या बहुप्रतीक्षित सीझनचा ट्रेलर शेअर करण्यासाठी दीर्घकाळापासून वाट पाहत आलो आहोत. आम्ही खात्री देतो की, हा सीझन यंदाच्याच उन्हाळ्याच्या शेवटापर्यंत सादर होईल. आम्ही आमचे वचन नेहमीच पाळले आहे, ज्याचा आम्हाला आनंद होत आहे. हा प्रतिक्षाकाळ अखेर 4th जून रोजी समाप्त होईल. श्रीकांत तिवारी थरारक पटकथेसह परतत आहे आणि 'नवीन चेहऱ्याच्या रूपात धोका येत आहे'– सामंथा अक्किनेनी, जिने उत्तम कामगिरी बजावली आहे. सोबतच प्रतिभावान कलाकार देखील आहेत. आम्हाला विश्वास आहे की, महामारीदरम्यान काम करावे लागले असले तरी आम्ही तुम्हा सर्वांसाठी रोमांचक सीझनची निर्मिती केली आहे. आशा करतो की, नवीन सीझन अद्वितीय ठरेल. हा अत्यंत अवघड काळ आहे आणि आम्ही लवकरच सर्वकाही सुरळीत होईल अशी आशा व्यक्त करण्यासोबत प्रार्थना करतो. कृपया सुरक्षित राहा, मास्क घाला आणि लवकरात लवकर लस घ्या.''
 
पुरस्काहर-प्राप्त अॅमेझॉन ओरिजिनल सिरीजमध्ये, दक्षिणेची सुपरस्टार सामंथा अक्किनेनीचे (Samantha Akkineni) डिजीटल पदार्पण होत आहे. या सिरीजमध्ये प्रतिभावान कलाकार देखील आहेत जसे पद्मश्री पुरस्कासर-प्राप्त मनोज वाजपेयी (Manoj Bajpayee), प्रियामणी (Priyamani), तसेच भारतभरातील इतर अविश्वनसनीय प्रतिभा असलेले कलाकार देखील आहेत जसे शरिब हाश्मी (Sharib Hashmi), सीमा बिस्वास (Seema Biswas), दर्शन कुमार (Darshan Kumar), शरद केळकर (Sharad Kelkar), सनी हिंदुजा (Sunny Hinduja), श्रेया धन्वंतरी (Shreya Dhanwantary), शाहब अली (Shahab Ali), वेदांत सिन्हा  (Vedant Sinha) आणि महक ठाकूर (Mahek Thakur). या सिरीजमध्ये तमिळ चित्रपटसृष्टी मधील प्रतिभावान कलाकार देखील आहेत- जसे मिमे गोपी (Mime Gopi), रविंद्र विजय (Ravindra Vijay), देवदर्शिनी चेतन (Devadarshini Chetan), आनंद सामी (Anandsami) आणि एन. अलगमपेरूमल (N. Alagamperumal).