सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: शुक्रवार, 15 फेब्रुवारी 2019 (11:54 IST)

छपाक चित्रपटाच्या पहिल्या फोटोत ओढणीवर दिसले ऍसिडचे शिंतोडे

बॉलीवूड अभिनेत्री दीपिका पदुकोनचे आगामी चित्रपट 'छपाक' ची तयारी जोरात चालू आहे. हा चित्रपट मेघना गुलजार  हिने दिग्दर्शित केला असून ती विलक्षण संवेदनशील विषयांवर चित्रपट तयार करण्यासाठी प्रसिद्ध आहे. मेघनाची शेवटची फिल्म 'राजी' बॉक्स ऑफिसवर धमाल केला आहे. त्याचवेळी, दीपिका पदुकोणचा चित्रपट 'पद्मावत' ने बॉक्स ऑफिसवर चांगले काम केले. दीपिकाने या चित्रपटानंतर कोणत्याही चित्रपटावर स्वाक्षरी केली नव्हती. रणवीर बरोबर विवाहानंतर दीपिका अभिनयाकडे परतली असून तिने पहिला चित्रपट 'छपाक' साइन केला. या चित्रपटात दीपिका लक्ष्मी अग्रवाल नावाच्या ऍसिड हल्ल्यात बळी पडलेल्या स्त्रीची भूमिका बजावणार आहे.
अलीकडे दिग्दर्शक मेघना गुलजार यांनी सोशल मीडियावर या चित्रपटाशी संबंधित एक फोटो शेअर केला आहे. फोटोमध्ये पिवळा स्कार्फ दिसत आहे ज्यात ऍसिड डाग दिसत आहेत. हा चित्रपट लक्ष्मी अग्रवाल हिच्या जीवनावर आधारित आहे, जिच्यावर ऍसिडने हल्ला करण्यात आला होता. या ऍसिड हल्ल्यात लक्ष्मीचा चेहरा वाईटरीत्या भाजला होता. पण यानंतर देखील लक्ष्मी अग्रवालने कसे स्वत:ला सशक्त उभे केले, हे सर्व आपल्याला या चित्रपटात पाहायला मिळणार आहे.
या चित्रपटासह दीपिका पदुकोन प्रोड्यूसर क्षेत्रात देखील उतरणार आहे, हे तिचे होम प्रॉडक्शन चित्रपट आहे. चित्रपटात दीपिका बरोबर विक्रांत मैसी दिसणार आहे.