बुधवार, 1 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: सोमवार, 19 डिसेंबर 2022 (10:22 IST)

Mission Majnu Teaser : 'मिशन मजनू'चा टीझर रिलीज

बॉलिवूडचा आकर्षक हिरो अशी प्रतिमा असलेला सिद्धार्थ मल्होत्रा ​​त्याच्या आगामी 'मिशन मजनू' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. आता निर्मात्यांनी चित्रपटाचा टीझरही रिलीज केला सिद्धार्थ मल्होत्रा ​​पुन्हा एकदा देशभक्तीच्या भावनेने भरलेला दिसत आहे. टीझरमध्येही त्याची जबरदस्त अॅक्शन पाहायला मिळत आहे. त्याचबरोबर पहिल्यांदाच रश्मिकासोबतच्या त्याची ऑनस्क्रीन केमिस्ट्रीची झलकही पाहायला मिळाली.
 
सिद्धार्थ मल्होत्रा ​​एका मिशनवर रॉ एजंटच्या भूमिकेत आहे. टीझरमध्ये सिद्धार्थ पाकिस्तानमध्ये राहणारा भारतीय गुप्तहेर दिसतो, जो आपल्या देशासाठी काहीही करायला तयार असतो. त्याचवेळी, रश्मिका आणि सिद्धार्थचा लव्ह अँगल दाखवण्यात येणार असल्याचे टीझरमधील झलकवरून कळते. टीझरमध्ये अभिनेत्री एका सुंदर वधूच्या पोशाखात दिसत आहे तर त्याच दृश्यात सिद्धार्थ डोक्यावर फेटा बांधलेल्या वराच्या रुपातही दिसत आहे.
 
टीझरच्या सुरुवातीला 1971 लिहिण्यात आले आहे. वास्तविक, मिळालेल्या माहितीनुसार, 'मिशन मजनू'ची कथा 1971 च्या युद्धादरम्यान तयार करण्यात आली आहे. हा चित्रपट सत्यकथांवरून प्रेरित आहे. सिद्धार्थ आणि रश्मिका व्यतिरिक्त या चित्रपटात परमीत सेठी, मीर सरवर आणि झाकीर हुसैन यांच्याही प्रमुख भूमिका आहेत.
 
मिशन मजनू' हा चित्रपट 20 जानेवारी 2023 रोजी OTT प्लॅटफॉर्म Netflix वर प्रदर्शित होणार आहे. रश्मिकाच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर ती 'गुडबाय' चित्रपटात दिसली होती. रश्मिकाने अमिताभ बच्चन अभिनीत गुडबाय या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.
 
Edited By - Priya Dixit