1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: शुक्रवार, 22 जानेवारी 2021 (11:35 IST)

‘मिस्टर लेले''मध्ये वरुणच्या जागेवर विकी

mr-lele
शशांक खेतान दिग्दर्शन करणार असलेल ‘मिस्टर लेले' या आगामी सिनेमात वरुण धवन लीड रोल करणार असल्या घोषणा झाली होती, वरुणचा फर्स्ट लूकदेखील रिलीज करण्यात आला होता. मात्र आता वरुणने या सिनेमातून माघार घेतली आहे. त्याला या सिनेमची कथा आवडली नव्हती. त्याने कथेमध्ये थोडा बदल सुचवला होता, असे समजते आहे. मात्र,त्याने सुचवलेल्या कथेवर काम करण्यापूर्वीच कोरोनाचे संकट आले. लॉकडाउनमुळे सिनेमाचे प्रोडक्शन थांबले होते. आता निर्मात्यांनी पुन्हा सिनेमाचे काम सुरू करायचे ठरवले आहे. शशांक यांनी नव्याने स्क्रिप्ट तयार केली आहे आणि वरुणच्या जागेवर विकी कौशलला घेतले आहे. विकीला सिनेमाची मूळकथा आवडली आणि त्याने लगेच गुप्तहेराच्या रोलला होकार दिला आहे. वरुणने आतापर्यंत अॅक्शन हिरोचा रोल केलेला नव्हता. त्याला ही संधी मिळाली होती.
 
पण त्याने नकार दिला आहे. विकी कौशलसाठी ‘उरी-सर्जिकल स्ट्राईक'च्या निमित्ताने ही दुसरी संधी मिळाली आहे. ‘मिस्टर लेले'मध्ये जान्हवी कपूर आणि भूमी पेडणेकर हेदेखील असणार आहेत.