मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: शुक्रवार, 20 मार्च 2020 (15:00 IST)

विकी कौशल आणि कातरिना डिनर डेटवर

विकी कौशल आणि कतरिना यांचे डेटिंग सुरू असल्याची चर्चा बर्‍याच दिवसांपासून सुरू आहे. अशातच हे दोघे पुन्हा एकदा एकत्र हिंडताना बघितले गेले आहेत. निमित्त होते निर्माता आरती शेट्टी यांच्याकडील डिनर पार्टीचे. विकी आणि कतरिना आपापल्या कारमधून डिनरच्या ठिकाणी पोहोचले. यावेळी तिथे उपस्थित असलेल्या गॉसिप गँगचे कॅमेरे चमकले आणि या दोघांना एका फ्रेममध्ये कॅच करण्यासाठी पब्लिकची धावपळ झाली.
 
विकी आणि कॅट बर्‍याच दिवसांपासून डेटिंग करत आहेत. पण दोघांपैकी कोणीही आपल्या डेटिंगबाबत खुलेपणाने काहीही बोललेले नाही. अगदी अलीकडे होळीच्या निमित्ताने विकी आणि कतरिनाचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यात कतरिनाला रंग लावताना विकी दिसत होता. विकीच्या करिअरचा ग्राफ गेल्या काही वर्षात खूप वेगाने वर चाललेला दिसतो आहे. सरदार उधम सिंग यांच्या जीवनावर तो करत असलेला सिनेमा आता पुढे ढकलला गेला आहे. आता हा सिनेमा पुढच्या वर्षी जानेवारीत रिलीज होणार आहे.