1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: शुक्रवार, 2 एप्रिल 2021 (10:48 IST)

प्रबोधनासाठी मुंबई पोलीसांची मजेदार पोस्ट

Mumbai Police tweet
मुंबईचे पोलिस बर्‍याचदा आपल्या मजेदार पोस्टसाठी चर्चेत आले आहे. मुंबई पोलिसांच्या सोशल मीडियावरील पोस्ट खूप मजेदार आणि मनोरंजक असतात. या मनोरंजक पोस्टच्या माध्यमातून मुंबई पोलिस लोकांना महत्त्वाचा संदेशही देतात.
 
मुंबई पोलिसांनी नुकतीच त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर एक मजेदार पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये मुंबई पोलिसांनी मनीषा कोइरालाच्या ‘खामोशी’ या चित्रपटाचे प्रसिद्ध गाणं ‘आज में उपर, आसमान निचे’ या गाण्याचा खुबीने वापर केला आहे. या पोस्टमध्ये मुंबई पोलिसांनी लिहिले की, 'आज मैं ऊपर क्योंकि मास्क है नीचे.'

या पोस्टच्या माध्यमातून मुंबई पोलिसांनी मास्क घाला आणि तो ही व्यवस्थीत रित्या घाला, नाही तर त्याचे परिणाम वाईट होतील, असे पटवून देण्याचा प्रयत्न केला आहे. जेणेकरून लोकं ते ऎकतील आणि कोरोनाच्या वाढत्या प्रभावाला कमी करण्यास मदत मिळेल.