गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: मंगळवार, 26 नोव्हेंबर 2024 (18:01 IST)

नागराज मंजुळे यांना महात्मा फुले समता’ पुरस्कार मिळणार

Nagraj Manjule
अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेतर्फे महात्मा फुले पुण्यतिथीच्या दिवशी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष छगन भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली दरवर्षी दिला जाणारा ‘महात्मा फुले समता पुरस्कार यंदाचा प्रसिद्ध दिग्दर्शक, लेखक आणि अभिनेता नागराज मंजुळे यांना दिला जाणार आहे.  
या पुरस्कारात त्यांना एक लाख रुपये, फुले पगडी, शाल मानपत्र आणि स्मृतिचिन्ह दिले जाणार आहे. 
 
अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने दरवर्षी महात्मा फुले पुण्यतिथी समता दिनाच्या निमित्ताने ‘महात्मा फुले समता पुरस्कार’ सामाजिक, राजकीय, साहित्य, पत्रकारिता यासारख्या विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या व्यक्तींना देण्यात येते. यंदाच्या पुरस्काराचे मानकरी नागराज मंजुळे हे ठरले असिन या पूर्वी हा पुरस्कार 
 
केंद्रीय कृषीमंत्री खा.शरदचंद्र पवार, माजी केंद्रीय मंत्री विरप्पा मोईली, खा.शरद यादव, छत्तीसगढ राज्याचे मुख्यमंत्री भूपेश बघेल, ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर, ज्येष्ठ विचारवंत रावसाहेब कसबे, ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढाव, ज्येष्ठ लेखक डॉ.भालचंद्र नेमाडे, डॉ. भालचंद्र मुणगेकर, लेखिका अरुंधती रॉय, प्रा.डॉ.मा.गो.माळी, ज्येष्ठ साहित्यिक फादर फ्रान्सिस दिब्रिटो, ज्येष्ठ कवी समीक्षक यशवंत मनोहर, डॉ. तात्याराव लहाने, ज्येष्ठ पत्रकार संजय आवटे, कै.प्रा.हरी नरके यांना प्रदान करण्यात आले. 

अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष आमदार छगन भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवार दिनांक 28 नोव्हेंबर 2024 रोजी सकाळी10:30 (साडेदहा) वाजता समता भूमी, फुले वाडा, पुणे येथे हा पुरस्कार प्रदान सोहळा होणार आहे, अशी माहिती अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे पुणे विभागीय अध्यक्ष प्रीतेश गवळी, शहर अध्यक्ष पंढरीनाथ बनकर, महिला शहर अध्यक्ष वैष्णवी सातव यांनी दिली आहे
Edited By - Priya Dixit