गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: मंगळवार, 26 डिसेंबर 2023 (21:04 IST)

लोकसभा निवडणूकीपूर्वी नाना पाटेकर यांनी केले भाकीत

हिंदी आणि मराठी सृष्टीतील अभिनेते नाना पाटेकर यांनी देखील लोकसभा निवडणूकीपूर्वी भाजपा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत भाकीत केले आहे.
 
नाना पाटेकर यांनी एका खासगी वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. ज्यावेळी त्यांनी निवडणुका आणि देशाचे राजकारण याबाबत वक्तव्य केले आहे. आगामी लोकसभा निवडणुकीबाबत तुम्हाला नेमके काय वाटते? असा प्रश्न यावेळी त्यांना विचारण्यात आला. ज्यावेळी याबाबत बोलताना ते म्हणाले की, आगामी निवडणुकीत भाजपाला 350 ते 375 जागा मिळतील आणि पुन्हा भाजपा सत्तेत येईल. भाजपा देशात उत्तम काम करत आहे. त्यामुळे 2024 मध्ये होणाऱ्या निवडणुकीत भाजपा पक्षाला नक्कीच यश मिळेल आणि पुन्हा नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान होतील. देशाकडे भाजपाशिवाय दुसरा पर्याय नाही, असे मोठे वक्तव्य नाना पाटेकर यांनी केले आहे.
 
Edited By-Ratnadeep Ranshoor