शुक्रवार, 16 जानेवारी 2026
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: शुक्रवार, 14 जुलै 2017 (11:01 IST)

रणवीर सिंगचा नवा लूक

ranveer singh
अभिनेता रणवीर सिंहच्या चाहत्यांना तो दाढी-मिशांच्या लुकमध्ये खूप आवडला होता आणि रणवीरनेही तो लुक आवडला होता. यामुळेच त्याने अनेक दिवस हा लूक तशाच ठेवला होता. देशभरात अनेक तरुणांनी त्याच्यामुळे दाढी आणि मिशी वाढवल्या होत्या. मात्र, रणवीर सिंग पुन्हा एकदा वेगळ्या लूकमध्ये दिसणार आहे. त्याने दाढी आणि मिशी दोन्ही कमी केल्या आहे.
 
रणवीर पुन्हा एकदा काहीतरी वेगळा दिसतो आहे. त्याने लाईव्ह केस कापले. त्याचा व्हिडिओ त्याने इंस्ट्राग्रामवर पोस्ट केला आहे. रणवीर सिंग मागील काही दिवसांपासून एक-ग्रेड दाढीमध्ये दिसत होता. त्याने नोव्हेंबरमध्ये ‘नो शेव्ह इन नोव्हेंबर’अशी शपथ घेतली होती. तो संजय लीला भन्साळी यांचा आगामी चित्रपट ‘पद्मावती’मध्ये अलाउद्दीन खिलजीची भूमिका करणार आहे. यासाठी त्याने हा लूक केला होता. पण आता त्याची शूटिंग पूर्ण झाली आहे. त्यामुळे आता तरुण खिलजीच्या भूमिकेसाठी त्याने दाढी मिशी कमी केली आहे.