बुधवार, 16 ऑक्टोबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: रविवार, 4 जून 2023 (14:57 IST)

Nithin Gopi Death: कन्नड अभिनेता नितीन गोपी यांचे हृदय विकाराच्या झटक्याने निधन

Nithin Gopi
कन्नड चित्रपट आणि टेलिव्हिजन इंडस्ट्रीतून एक वाईट बातमी समोर येत आहे. अभिनेते नितीन गोपी यांचे शुक्रवारी सकाळी वयाच्या39 व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. मीडिया रिपोर्ट्सनुसार, नितीनला जेव्हा हृदयविकाराचा झटका आला तेव्हा ते त्यांच्या घरी होते अचानक त्यांच्या छातीत दुखू लागले आणि त्यांची प्रकृती ढासळू लागली. त्यामुळेच त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. जिथे त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
 
नितीन गोपीचे घर बंगळुरूच्या इट्टामाडू येथे आहे. 2 जून 2023 रोजी त्यांची प्रकृती उत्तम होती. मात्र अचानक त्यांना छातीत तीव्र वेदना होऊ लागल्या. त्यानंतर कुटुंबीय आणि नातेवाईकांनी त्यांना रुग्णालयात दाखल केले. पण डॉक्टर अभिनेत्याला वाचवू शकले नाहीत. नितीन यांच्या जाण्याने त्यांच्या चाहत्यांना दु:ख झाले आहे.
 
नितीन गोपी यांनी कन्नड इंडस्ट्रीत आपली खास ओळख निर्माण केली होती. तो केवळ टीव्हीच नाही तर चित्रपटांमध्येही उत्तम काम करत आहे. 'हॅलो डॅडी'मधून त्याला  इंडस्ट्रीत प्रसिद्धी मिळाली. या चित्रपटात त्यांनी डॉ. विष्णुवर्धन यांच्या विरुद्ध बासरीवादकाची भूमिका साकारली होती.
 
याशिवाय नितीनने 'केरळ केसरी', 'मुथिनंत हेंडती', 'निशब्द' आणि 'चिरबांधव्य' यांसारख्या चित्रपटांमध्येही काम केले होते. अवघ्या 39 वर्षात त्यांनी इंडस्ट्रीत स्वत:चा ठसा उमटवण्यात यश मिळवले. पण हृदयविकाराच्या झटक्याने इंडस्ट्रीतील स्टार हिरावून घेतला.
 
Edited by - Priya Dixit