सिगरेट अँड अदर टोबॅको प्रॉडक्ट्स अॅक्ट (कोटपा) 2003 नुसार या सर्वांना दिल्लीतील आरोग्य विभागाने नोटीस बजावली आहे. करण जोहर आणि रोहित शेट्टी या शोचे जज आहेत. कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच धर्मा प्रॉडक्शनचं नाव येत असल्यानं त्यांना नोटीस पाठवण्यात आली आहे. या प्रकरणात कोटपा कायद्याचं उल्लंघन केल्याप्रकरणी करणला दुसऱ्यांदा नोटीस पाठवण्यात आली आहे.