बुधवार, 1 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: मंगळवार, 28 मार्च 2023 (12:17 IST)

ओडिया अभिनेत्री रुचिस्मिता गुरू यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली

अलीकडेच, चाहत्यांना भोजपुरी अभिनेत्री आकांक्षा दुबेच्या निधनाच्या दुःखातून सावरताही आले नाही की आता मनोरंजन विश्वातून आणखी एक दुःखद बातमी येत आहे. उडिया अभिनेत्री-गायिका रुचिस्मिता गुरु यांचे संशयास्पद परिस्थितीत निधन झाले आहे. 

मीडिया वृत्तानुसार, अभिनेत्री रुचिस्मिता गुरु तिच्या नातेवाईकाच्या घरी मृतावस्थेत आढळून आली आहे.
ती सुदापाडा येथे मामाच्या घरी राहात होती. रुचिस्मिता गुरूने अनेक अल्बममध्ये काम केले आहे. अभिनयासोबतच ती गायनाच्या जगातही सक्रिय होती. रुचिस्मिता गुरूने अनेक स्टेज शोमध्ये परफॉर्म केले होते.
रुचिस्मिता गुरुचे मृतदेह खोलीत पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळले. माहिती मिळताच बलांगीर पोलिस ठाण्याचे पथक घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत.  रुचिस्मिताच्या आईने सांगितले की, बटाट्याचा पराठा बनवण्यावरून तिचा मुलीसोबत वाद झाला.मी तिला रात्री आठ वाजता बटाट्याचा पराठा बनवायला सांगितला, पण तिने रात्री दहा वाजता बनवणार असल्याचे सांगितले. यावरून आमच्यात भांडण झाले. अभिनेत्रीने यापूर्वीही अनेकवेळा आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे बोलले जात आहे. सध्या पोलीस या अभिनेत्रीच्या मृत्यूचे कारण शोधण्यात गुंतले आहेत. 
 
Edited By- Priya Dixit