गुरूवार, 23 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: सोमवार, 27 मार्च 2023 (08:47 IST)

सलमान खानला धमकीचा ई-मेल पाठवणाऱ्याला अटक

salman khan
बॉलीवूडचा सुपरस्टार सलमान खान सध्या त्याच्या रील आणि रिअल लाईफमुळे खूप चर्चेत आहे. एकीकडे त्याचा बहुप्रतिक्षित 'किसी का भाई किसी की जान' हा चित्रपट रिलीज होणार आहे. दुसरीकडे, सलमान खानला धमकीचे ई-मेल येत आहेत. नुकतीच एक बातमी आली होती की, बॉलिवूडचा 'दबंग' खानला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. 
 
हे प्रकरण गांभीर्याने घेत मुंबई पोलिसांनी अभिनेत्याच्या घराबाहेर चोख बंदोबस्त ठेवला होता. दोन दिवसांपूर्वी सलमानला धमकीचा ई-मेल आला होता, ज्यामध्ये तेरा हाल भी मुसेवाला जैसा होगा, असे लिहिले होते, 
सलमान खानला जीवे मारण्याची धमकी देणाऱ्याला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणात सक्रियपणे कारवाई करत मुंबई पोलिसांनी धाकड राम विश्नोई याला राजस्थानमधील जोधपूर येथून ताब्यात घेतले आहे. राजस्थान आणि मुंबई पोलिसांच्या संयुक्त कारवाईत धमकी देणाऱ्याला अटक करण्यात आली आहे.

आरोपीने दिवंगत गायक सिद्धू मुसेवाला यांच्या कुटुंबालाही धमकी दिली होती, त्यानंतर पंजाब पोलीसही त्या व्यक्तीचा शोध घेत होते. त्याचबरोबर आता तपासानंतर आरोपीला पंजाब पोलिसांच्या ताब्यात दिले जाऊ शकते.यापूर्वीही सलमान खानला धमकीचा ई-मेल पाठवण्यात आला होता.  धमकीचा ई-मेल वांद्रे पोलिसांना अभिनेत्याचे व्यवस्थापक प्रशांत गुंजाळकर यांनी कळवला होता. या प्रकरणावर कारवाई करत मुंबई पोलिसांनी सलमान खानच्या घराबाहेर सुरक्षा वाढवली होती.
 
 
Edited By - Priya Dixit