शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: बुधवार, 19 एप्रिल 2017 (23:02 IST)

भटकत आहे ओम पुरीची आत्मा!!! (बघा व्हिडिओ)

सध्या एक व्हिडिओ वायरल होत आहे ज्यात पांढरा कुर्ता घालून एक व्यक्ती दिसत आहे जी  ओम पुरीची आत्मा आहे असे सांगण्यात येत आहे. ओम पुरी यांचा मृत्य या वर्षी 6 जानेवारी रोजी झाला होता आणि हा व्हिडिओ 14 जानेवारीचा आहे. हा व्हिडिओ पाकिस्तानी चॅनलचा आहे ज्यात एंकर सांगत आहे की दृश्य ओमपुरीच्या घराबाहेरचे आहे. रात्री पांढर्‍या कपड्यांमध्ये  एक सावली दिसत आहे. याला ओम पुरीची आत्मा म्हणून संबोधण्यात येत असून ती बदला घेण्यासाठी येथे आली आहे. एंकर आमिर लियाकतने हे ही सांगितले की ओम पुरी जेथे राहत होते त्याच्या जवळपास काही दिवसांपासून त्यांची आत्मा दिसत आहे आणि ती त्यांच्या मारेकरुचा शोध लावत आहे.