सलमान खानचा आगामी चित्रपट 'ट्यूबलाईट' चे पहिले पोस्टर रिलीज झाले . मंगळवारी चित्रपटाचा टीजर रिलीज करण्यात आल्यानंतर बुधवारी हा पोस्टर रिलीज करण्यात आला. सलमान खानने आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन हा पोस्टर शेअर केला आहे. या पोस्टरमध्ये सलमान खान 'क्या आपको यकीन है ?' असा प्रश्न विचारताना दिसत आहे. मात्र चाहत्यांना अद्याप सलमान खानची झलक पहायला मिळाली नाही.