शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: सोमवार, 3 जुलै 2023 (18:59 IST)

OMG 2: कपाळावर भस्म .. गळ्यात रुद्राक्ष.. लांब केसांत महादेवाच्या रूपात अक्षय कुमार

अक्षय कुमार सध्या त्याच्या आगामी चित्रपट OMG 2 साठी चर्चेत आहे. काही काळापूर्वी या चित्रपटाच्या पोस्टरसह त्याची रिलीज डेट जाहीर करण्यात आली होती. आता पुन्हा एकदा या चित्रपटाचे दोन पोस्टर शेअर करण्यात आले आहेत. खिलाडी कुमार एका पोस्टरमध्ये भगवान शंकराच्या भूमिकेत दिसत आहे. अभिनेत्याने हे पोस्टर सोशल मीडियावर शेअर करताच, चाहते त्याच्या लूकने प्रभावित झाले आणि सतत कमेंट करत आहेत. अक्षयने ही पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे.
 
अक्षय कुमार एका वेगळ्या रूपात दिसणार आहे. लांब केस, भस्म आणि गळ्यात रुद्राक्षाची माळ असलेला अक्षय पहिल्यांदा भोलेनाथच्या अवतारात दिसत आहे. चित्रपटाचा विषय लैंगिक शिक्षणावर आधारित असेल. हा चित्रपट कोर्टरूम ड्रामा असेल, ज्यामध्ये एक नागरिक शाळांमध्ये सक्तीच्या लैंगिक शिक्षणाची मागणी करत न्यायालयात जातो.
 
OMG 2 मध्ये पंकज त्रिपाठी कांती शरण मुदगलच्या भूमिकेत दिसणार आहे. पोस्टर शेअर करताना अभिनेत्याने लिहिले, "टीझर लवकरच येत आहे आणि OMG 2 11 ऑगस्ट रोजी थिएटरमध्ये दाखल होईल." सनी देओलचा गदर 2 आणि रणबीर कपूरचा अॅनिमलही याच दिवशी रिलीज होणार आहे.
 



Edited by - Priya Dixit