गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: शनिवार, 1 एप्रिल 2023 (17:04 IST)

शिल्पा शेट्टी आणि अक्षय कुमारचं ब्रेकअप का झालं?

मैं खिलाडी तू अनाडी आणि इन्साफ यांसारख्या चित्रपटांमध्ये एकत्र काम करत असतानाच शिल्पा शेट्टी आणि अक्षय कुमार यांच्या मैत्रीचे रुपांतर जवळीकीत झाले आणि दोघेही एकमेकांना खूप आवडू लागले.
 
लवकरच त्यांचा रोमान्स चर्चेत आला. शिल्पाच्या जवळ येण्याआधी पूजा बत्रा, रवीना टंडनसह काही मुलींसोबत त्यांची नावे जोडली गेली होती.
 
अक्षय आणि शिल्पाची जोडी पडद्यावर आणि ऑफ स्क्रीनवर चांगली दिसत होती. दोघेही एकमेकांसोबत कम्फर्टेबल दिसत होते.
 
अक्षयने इतर मुलींसोबत टाईमपास केला असला तरी तो शिल्पाबाबत गंभीर आहे, असे वाटत होते.
 
शिल्पाही अक्षयसोबतच्या तिच्या रोमान्समध्ये इतकी गुंतली की तिने तिच्या करिअरवर लक्ष केंद्रित करणं सोडून दिलं. दरम्यान, अचानक शिल्पा आणि अक्षयमध्ये ब्रेकअप झाल्याची बातमी समोर आली.
 
अचानक असे काय घडले की शिल्पाने अक्षयपासून फारकत घेतली याचे सर्वांनाच आश्चर्य वाटले.
 
असे म्हटले जाते की, अक्षयची शिल्पासोबतची जवळीक हळूहळू वाढत असतानाच त्याने राजेश खन्ना आणि डिंपल कपाडिया यांची मुलगी ट्विंकल खन्ना यांच्यासोबत रोमान्सही सुरू केला.
 
जेव्हा शिल्पाला हे कळाले तेव्हा तिने अक्षयसोबत ब्रेकअप केले. अखेर अक्षयने ट्विंकलसोबत लग्न केले.