सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: सोमवार, 13 मार्च 2023 (11:35 IST)

Oscars 2023 ऑफ शोल्डर ड्रेसमध्ये दिसली Deepika Padukone

दीपिका पदुकोण यंदा ऑस्कर अवार्ड फंक्शनचा भाग आहे. अशात दीपिका तिच्या खास स्टायलिश स्टाईलमध्ये दिसत आहे. यावेळी दीपिकाने लुई व्हिटॉनचा कस्टम मेड डिझायनर ड्रेस परिधान केला होता. दीपिका पदुकोणने सॅटिन ग्लोव्हजसह काळ्या रंगाचा ऑफ-शोल्डर गाऊन घातला आहे. तिचा लुक स्टाइल करताना दीपिकाने कार्टियरचा स्टेटमेंट नेकपीस घातला होता. लुक पूर्ण करण्यासाठी दीपिकाने तिचे केस एका सैल लो बनमध्ये बांधले. दीपिकाने मेकअप हलकाच ठेवला आहे.
 
95 व्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात भारताच्या शिरपेचात आणखी मानाचा तुरा खोवला गेला आहे. RRR या चित्रपटातल्या ‘नाटू नाटू’ या गाण्याला ‘बेस्ट ओरिजनल साँग’चा ऑस्कर पुरस्कार मिळाला आहे. भारतीय प्रोडक्शनमध्ये बनलेलं हे पहिलं गाण आहे ज्याला ऑस्कर पुरस्कार मिळाला आहे.