मंगळवार, 26 ऑगस्ट 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: मंगळवार, 19 फेब्रुवारी 2019 (08:48 IST)

पाकिस्तानी गायकांची गाणी युट्यूब चॅनेलवरून हटवली

Pakistani singer
पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर टी- सीरिजनं पाकिस्तानी गायक राहत फतेह अली खान आणि आतिफ अस्लम यांची गाणी युट्यूब चॅनेलवरून हटवली आहेत. भारतीय संगीतकारांनी पाकिस्तानी गायक किंवा कलाकारांना भारतात काम देऊ नये, अन्यथा मनसे धडा शिकवेल असा इशारा मनसे सिने विभागाचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी गेल्या आठवड्यात दिला होता. त्यानंतर टी- सीरिजनं आपल्या युट्यूबवरनं राहत फतेह अली खान आणि आतिफ अस्लमची गाणी हटवली आहेत. टी- सीरिज हे जगातील सर्वाधिक पाहिलं गेलेलं दुसऱ्या क्रमांकाचं युट्युब चॅनेल आहे. काही दिवसांपूर्वी पाकिस्तानी गायक राहत फतेह अली खान आणि आतिफ अस्लम यांनी टी सीरिजसाठी एकत्र येऊन गाणी गायली होती. व्हॅलेंटाइन डे दिवशी आतिफ अस्लमचं ‘बारिशें’ हे गाणं टी- सीरिजनं लाँच केलं होतं . मात्र पुलवामा हल्ल्यानंतर हे गाणं काढून टाकण्यात आलं आहे .