शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: मंगळवार, 5 ऑक्टोबर 2021 (13:10 IST)

पंकज त्रिपाठी 'ओह माय गॉड 2' मध्ये दिसणार,अक्षय कुमार पुन्हा एकदा भगवान श्रीकृष्णाच्या भूमिकेत झळकणार

अभिनेता पंकज त्रिपाठी यांनी 'ओह माय गॉड 2' (OMG) या चित्रपटात दिसणार आहे.पंकज व्यतिरिक्त, अक्षय कुमार आणि यामी गौतम देखील या सामाजिक विनोदी चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटात अक्षय कुमार पुन्हा एकदा भगवान कृष्णाच्या पात्रात झळकणारआहे.
 
अक्षय या चित्रपटाचे शूटिंग ऑक्टोबरमध्ये सुरू करेल.
सूत्रांच्या माहितीनुसार, "दिग्दर्शक अमित राय यांनी पंकज त्रिपाठी यांच्यासोबत मुंबईत चित्रपटाचे शूटिंग सुरू केले आहे. पुढील काही दिवस पंकज चित्रपटाच्या काही भागासाठी एकटे असतील. यामी गौतम चित्रपटाचे पुढील शूटसाठी टीममध्ये सामील होईल. अक्षय कुमार ऑक्टोबरमध्ये चित्रपटाच्या टीमसोबत शूटिंग सुरू करतील.अक्षयने निर्मात्याला 'ओह माय गॉड 2' मध्ये भगवान कृष्णा याच्या पात्राच्या चित्रीकरणासाठी 15 ते 20 दिवसांचा वेळ दिला आहे.
 
'OMG 2' ची थीम प्रेक्षकांना स्तब्ध करणारी असणार 
. दोघेही चित्रपटाबद्दल खूप उत्सुक आहेत. सूत्रांनी सांगितले की, 'ओह माय गॉड' नंतर, कथा पुढे नेण्यासाठी निर्माते चित्रपटाच्या दुसऱ्या भागाच्या स्क्रिप्टवर एक दशकाहून अधिक काळ काम करत आहेत. निर्मात्यांनी पहिल्या भागापेक्षा पटकथा उत्तम केल्याचे समाधान झाल्यानंतरच चित्रपटाचा दुसरा भाग बनवण्याचा निर्णय घेतला.
 
असे सांगितले जात आहे की 'ओह माय गॉड 2' ची थीम प्रेक्षकांना आश्चर्यचकित करणारी ठरेल. 2012 मध्ये रिलीज झालेल्या 'ओह माय गॉड' मध्ये परेश रावल आणि अक्षय मुख्य भूमिकेत दिसले होते. या चित्रपटाचे दिग्दर्शन उमेश शुक्ला यांनी केले होते.