‘परी’ चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित
अभिनेत्री अनुष्का शर्माचा आगामी ‘परी’ हा चित्रपट पुढील वर्षी 9 फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रोजित रॉय करीत असून या चित्रपटाची सह-निर्माती अनुष्का आहे. ‘परी’ चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित करीत अनुष्काने प्रदर्शनाची तारीख जाहीर केली. गेल्या महिन्यात तिने ‘परी’चे पहिले पोस्टर प्रसिध्द केले होते. यात ती पूर्ण वेगळी दिसत होती आणि ओळखूही येत नव्हती. चित्रपटात बंगाली अभिनेता परमब्रत चटर्जी यांची भूमिका असणार आहे. याचे शूटींग मुंबई आणि कोलकात्यात पार पडणार आहे.