गुरूवार, 23 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: शनिवार, 20 मे 2023 (08:51 IST)

परिणीती चोप्राचा २८ किलो वजन कमी करण्याचा सकाळपासून रात्रीपर्यंत असा होता डाएट प्लॅन?

बॉलिवूड ब्युटी परिणीती चोप्रा पंजाबी सूट मधील लुक अनेकांच्या पसंतीस उतरला आहे. पण परिणितीच्या फिट आणि फाईन लुकमागे बरीच मेहनत लपलेली आहे. फक्त तिचा ड्रेस महागडा आहे म्हणूनच नव्हे तर आपली बॉडी परफेक्ट साईझमध्ये ठेवण्यासाठी परिणितीने खास कष्ट केले आहेत.

परिणितीने वजन कमी करण्यासाठी व्यायामासह आपल्या डाएटवर विशेष लक्ष दिले होते. जास्त कार्ब्स, फॅट्स व साखर असलेले पदार्थ तिने पूर्णपणे वर्ज्य केले होते. तसेच आपण झोपण्याच्या आणि जेवण्याच्या वेळेत निदान दोन तास अंतर ठेवत असल्याचेही तिने मुलाखतीत सांगितले होते. काही रिपोर्ट्सनुसार परिणितीचा वजन कमी करण्याचा डाएट प्लॅन कसा होता हे पाहूया…
 
ब्रेकफास्ट
परिणिती सांगते की, ती नाष्टा कधीही टाळायची नाही. यामध्ये शक्यतो ब्राऊन ब्रेड व बटर, अंड्याचा केवळ पांढरा भाग, ताज्या फळांचा ज्यूस किंवा एक ग्लास दूध असे ती सेवन करत असे.
 
दुपारचे जेवण
यामध्ये ती सहसा ब्राऊन राईस, डाळ व हिरव्या पालेभाज्या खाण्याचा प्रयत्न करायची. प्रत्येक जेवणात सॅलड असेलच याकडे तिने विशेष लक्ष दिले होते.

रात्रीचे जेवण
झोपताना ती हलका आहार घ्यायची ज्यामध्ये शक्यतो कमी तेलात बनलेले व विशेषतः हिरवेगार पदार्थ समाविष्ट असायचे तसेच झोपण्याच्या दोन तास आधी ती एक ग्लास दूधही पित असे.
 
परिणितीने वजन कमी करण्याच्या प्रवासात पिझ्झा, फ़्राईज यांचे सेवन पूर्णपणे बंद केले होते तसेच तिने आपल्या मेटाबॉलिजमला वाढवण्यासाठी विशेष मेहनत घेतली होती. अनेकदा आपलीही चयापचय क्रिया संथ असल्यास वजन काही न करताही पटकन वाढू शकते. यामुळे आहारात फायबरयुक्त पालेभाज्या व पदार्थांचा समावेश करणे आवश्यक आहे.
 
मीडिया रिपोर्टनुसार केवळ व्यायाम व डाएट नव्हे तर परिणितीने एका खास डिटॉक्स प्रोग्रॅममध्येही आपले नाव नोंदवले होते ज्यासाठी तिने थोडेथोडके नव्हे तर तब्बल 10लाख रुपये मोजले होते. तुम्ही तुमच्या शरीराच्या प्रकारानुसार व गरजा तसेच इतर रुटीन गोष्टींनुसार आपल्यासाठी डाएट प्लॅन बनवून घेऊ शकता पण यासाठी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला आवर्जून घ्या.
 
Edited By - Ratnadeep ranshoor