मंगळवार, 19 ऑगस्ट 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: सोमवार, 15 मे 2023 (17:06 IST)

Saba Saudagar Wedding: अभिनेत्री सबा सौदागर लग्नबंधनात अडकली

Saba Saudagar Wedding
social media
Saba Saudagar Wedding:  बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्राने शनिवारी तिचा प्रियकर आणि आप नेते राघव चढ्ढासोबत एंगेजमेंट केली. तर दुसरीकडे आणखी एका अभिनेत्रीने लग्न केले,
सबाने तिचा दीर्घकाळचा प्रियकर आणि लेखक-दिग्दर्शक चिंतन शाह याच्यासोबत लग्नगाठ बांधली. अभिनेत्रीने तिच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. साबा आणि चिंतन यांनी 10 मे 2023 रोजी कोर्ट मॅरेजसाठी नोंदणी केली होती आणि त्यानंतर 11 मे रोजी दोघांनी गोव्यात त्यांच्या जवळच्या लोकांमध्ये आणि मित्रांमध्ये लग्न केले.
 
या जोडप्याने गोव्याच्या बीचवर अगदी साधेपणाने लग्न केले. या खास प्रसंगी सबा सौदागरने लाल रंगाची साडी नेसली होती. हे आणखी सुंदर दिसण्यासाठी त्यावर हिरव्या रंगाचे दागिने कॅरी केले होते. दुसरीकडे चिंतन शाह क्रीम रंगाच्या शेरवानीमध्ये दिसला. दोघांनीही गळ्यात गुलाबी फुलांची माळ घातली .
 
दोघांनी एकमेकांना 6 वर्षे डेट केले. आमच्या लग्नाची वेडिंग कार्ड चिंतनने बनवली होती आणि त्यावर 'काहीही फॅन्सी नाही, फक्त प्रेम' असे लिहिले होते, असे अभिनेत्रीने तिच्या मुलाखतीत सांगितले होते.आता लग्नानंतर हे जोडपे हनीमूनसाठी युरोपला जाणार आहे. सबा 'क्रॅकडाउन' आणि 'गंदी बात' सारख्या शोमध्ये दिसली आहे.


Edited By -Priya Dixit