शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: रविवार, 7 मे 2023 (15:36 IST)

स्वाभिमान शोध अस्तित्वाचा मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप

social media
स्टार प्रवाह ची मालिका स्वाभिमान शोध अस्तित्वाचा लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. या मालिकेतून याचे कलाकार प्रेक्षकांचा घरात आणि मनात पोहोचले आहे. मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार असे मालिकेतील मराठमोळी कलाकार आसावरी जोशी यांनी सोशल मीडियावर पोस्ट करून  सांगितले आहे. 
आसावरी या मालिकेत आदिती सूर्यवंशीची भूमिका साकारतात आहे. त्यांनी भावुकपणे मालिका निरोप घेण्याचे सांगत आपल्या भावना शेअर केला आहेत 

आसावरी यांनी वाढदिवसाच्या निमित्ताने पोस्ट शेअर केली असून त्यात लिहिले आहे की, ' आज माझ्या वाढदिवसानिमित्तानं मी पार्ले इथल्या स्वामी समर्थांच्या मठात जाऊन त्याचं दर्शन घेतलं. आज सकाळपासूनच अनेकांनी मला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यामुळे चाहत्यांचं हे प्रेम पाहून मी खूप भारावून गेले आहे. तुम्हा सर्वांचे मनापासून आभार...'
त्यांनी लिहिले आहे की स्वाभिमान ही मालिका आज प्रेक्षकांचा निरोप घेत आहे. या मालिकेने आज 700 भाग पूर्ण केले असून या मालिकेतून सर्व प्रेक्षकांचं करमणूक करता आली. याच आम्हाला आनंद आहे. मी लवकरच एका नव्या मालिकेतून आपल्या लाडक्या प्रेक्षकांना भेटायला येणार आहे. मला तुमच्या सदिच्छाची खूप गरज आहे. धन्यवाद...आसावरी जोशी .त्यांच्या या पोस्टला त्यांच्या चाहत्यांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. तसेच त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहे.स्वाभिमान शोध अस्तित्वाचा ही मालिका प्रेक्षकांमध्ये खूपच लोकप्रिय झाली आहे. आता ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेत आहे. अभिनेत्री पूजा बिरारी आणि अभिनेता अक्षर कोठारी यांच्या प्रमुख भूमिका होत्या.अशोक शिंदे, प्रसाद पंडित सारखे मोठे कलाकार देखील या मालिकेत होते. 
 
Edited by - Priya Dixit