शनिवार, 1 नोव्हेंबर 2025
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: रविवार, 7 मे 2023 (15:12 IST)

मराठमोळ्या अभिनेता ऋषी मनोहरचा साखरपुडा झाला

Engagement Ceremony
social media
Engagement Ceremony :अभिनेता ऋषी मनोहर याचा साखरपुडा 3 मे रोजी  आपल्या मैत्रिणी तन्मई पेंडसे हिच्या सह झाला. या साखरपुड्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 
या साखरपुड्यासाठी उमेश कामात आणि प्रिया बापट यांनी उपस्थिती दर्शविली. ऋषी मनोहर हा एक अभिनेता असून  दिग्दर्शक देखील आहे. 
 
त्याने उमेश कामातच्या दादा एक गुड न्यूज आहे या नाटकातून अभिनयात आपले पाऊल टाकले तसेच ऋषीने एका काळेचे मनी या वेब सिरीज मध्ये देखील भूमिका केली आहे. त्याचा कन्नी हा आगामी चित्रपट येणार आहे.
 
ऋषीने आपल्या मैत्रीण तन्मई पेंडसेला ऑफिशिअल प्रपोज केले होते. त्यांनी आपल्या नात्याला घट्ट करण्यासाठी साखरपुड्याच्या समारंभ केला. एंगेजमेंट सोहळ्याला उमेश कामत आणि प्रिया बापट यांनी आवर्जून हजेरी लावली होती
 
ऋषींचे वडील राजेंद्र  हे एक क्रिकेटर आहे तर ऋषींची आई पौर्णिमा मनोहर या देखील सुप्रसिद्ध अभिनेत्री असून मराठी सिने विश्वात बऱ्याच वर्षांपासून काम करत आहे. 
 
Edited by - Priya Dixit