बुधवार, 22 ऑक्टोबर 2025
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: रविवार, 23 एप्रिल 2023 (16:17 IST)

अभिनेता संकेत पाठक आणि सुपर्णा श्याम यांचा लग्न सोहळ्यात निवेदिता सराफ यांची हजेरी

Sanket Pathak and Suparna Shyam wedding
बहुचर्चित मराठमोळी कलाकारांची जोडी संकेत पाठक आणि सुपर्णा श्याम यांचा आज मोठ्या थाटामाटात लग्नसोहळा पुण्यातील शिरगाव म्हणून प्रसिद्ध असलेल्या प्रतिशिर्डी येथे पार पडला. ते सात वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते. ते 2016 साला पासून एकत्र असून सात वर्षानंतर लग्नबंधनात अडकले .सुपर्णा आणि संकेत हे दोघेही दुहेरी या मालिकेतून एकत्रित काम करत होते. तेव्हाच या दोघांचे प्रेम फुलले. अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर या दोघांनी लग्नगाठ बांधण्याचा निर्णय घेतला.दोन्ही कुटुंब लग्नस्थळी हजेर झाले होते.

दोघांच्या घरी चार दिवसांपूर्वी ग्रहमख पूजन  करण्यात आले नतंर मेहंदीचा  सोहळा झाला. लग्नस्थळी त्यांच्या हळदीचा कार्यक्रम झाला. नंतर लग्नाचा सोहळा पार पडला. संगीताच्या कार्यक्रमात संकेतचे भावंडांसोबत ठेका धरताना दिसला. यावेळी निवेदिता सराफांची उपस्थिती लागली. या खासकरून त्या दोघांना आर्शीवाद आणि शुभेच्छा देण्यासाठी हजर होत्या.संकेत आणि सुपर्णा यांचा पुण्यातील प्रतिशिर्डीच्या एका राजवाड्यात थाटामाटात पार पडला. या वेळी सुपर्णाने लग्नासाठी हिरव्या रंगाची नऊवारी साडी नेसली तर संकेतने लाल  धोतर नेसले असून डोक्यावर फेटा घातला होता.    
 
निवेदिता सराफ निळ्याशार रंगाच्या साडीत अत्यंत सुंदर दिसत होत्या. त्या दोघांना  आशीर्वाद आणि शुभेच्छा देण्यासाठी आल्या होत्या 

सुपर्णानं यावेळी आकर्षक अशा वेशभुषा केली होती. दुल्हनच्या रेड लुकमध्ये ती अत्यंत खुलून दिसत होती. लग्नमंडपात एकमेकांना हार घालताना सुपर्णानं नेसलेली हिरव्या रंगाची साडी आणि लाल रंगाचा ब्लाऊजही क्लासी दिसत होता. तर संकेतनं पांढऱ्या रंगाचा ब्लेझर परिधान केला होता. 
Photo- Instagram 

Edited By - Priya Dixit