1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified गुरूवार, 2 फेब्रुवारी 2023 (16:05 IST)

Vanita Kharat अभिनेत्री वनिता खरातच्या हळदीचे फोटो

haldi poto
Instagram
शाहिद कपूरसोबत सिनेमात काम केलेली अभिनेत्री वनिता खरात आज बोहल्यावर चढणार आहे. हळदी समारंभात तिने तिच्या होणाऱ्या नवऱ्यासोबत धम्माल डान्स केला असून तो व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.  
 
कबीर सिंग या सिनेमात वनिता ने काम केले ती असून महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमातून घराघरात पोहोचली आहे. तिचे आणि सुमितच्या हळदी समारंभासाचे फोटो, व्हिडीओ पर्पल मराठी या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये वनिता व सुमित धम्माल मस्ती करताना दिसत आहेत. त्यांच्यावर फुलांचा वर्षाव करण्यात येत आहे.
 
वनिता व सुमितने हळदीसाठी खास पांढऱ्या रंगाचा अन् पिवळ्या फुलांची डिझाइन असलेला ड्रेस घातला होता. महाराष्ट्राची हास्यजत्रेतील कलाकारांनीही त्यांच्या हळदीच्या कार्यक्रमांना हजेरी लावली. कालच वनिताच्या मेहेंदी कार्यक्रम पार पडला. मेहेंदी सोहळ्यानंतर वनिताने नववधूचा हिरवा चुडा भरलेल्या हाताचा फोटो शेअर केला होता.